मराठवाड्यातील जेष्ठ संगीततज्ञ
पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचा आज जन्मदिन.
गुरुजी यांचा जन्म १५ एप्रील १९३९ रोजी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर या गावी झाला होता.
वयाच्या सहाव्या वर्षी अंधत्व आल्यामुळे त्यांना दादर येथील अंधशाळेत शिक्षणासाठी पाठवण्यात आले.
त्यांनी पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. नारायणराव व्यास, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले होते.
उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्या कडून फरुखाबाद घराण्याचे, पंडित बद्रिप्रसाद मिश्र यांच्याकडून बनारस घराण्याचे तर खलिफा नथ्थू खाँ यांच्याकडून दिल्ली घराण्यातील तबला वादनाची तालीम पूर्ण केलेली होती.
१९७१ मध्ये पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचे लातूरात आगमन झाले होते.
१९७३ साली त्यांनी लातूरात सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना करुन संगीत शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली होती.
गायन, तबलावादन, व्हायोलीन, बासरी, मृदंग, सतार इत्यादी वाद्ये वाजवण्यात ते पारंगत होते. अखिल भारतीय गांधर्व मंडळासाठी त्यांनी ६२६४ मिटर जागा संगीताच्या उपक्रमासाठी दान दिली होती.
पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या सांगितीक कार्याच्या गौरवाबद्दल कर्नाटक सरकारने त्यांना २००८ मध्ये कलाश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.
महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतीक पुरस्कार २०१७ मध्ये दिलेले होता.
तर अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्यावतीने नुकतेच त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले होते.
●अशी होती कारकिर्द -
लातूर जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील मेरुमणी म्हणून ओळख असणारे पं.शांताराम चिगरी गुरुजी.
आपले संपूर्ण आयुष्यच त्यांनी संगीतक्षेत्रासाठी अर्पण केलेले होते.
असा संगीततज्ज्ञ पुन्हा निर्माण होणे नाही.
लातूर जिल्ह्यातील संगीत क्षेत्राची ओळखच पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या नावानेच होती.
१५ एप्रील १९३९ रोजी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर या छोट्याशा गावात झालेला. त्यांच्या वडिलांचें नाव होते विरगंटीअप्पा तर आईचे नाव होते विरम्मा. या दांपत्यास पाच अपत्ये होती. अठराविश्व दारिद्र्य घरात होते. वयाच्या ८ व्या वर्षी देवीच्या साथीमध्ये शांताराम यांना डोळयाचे अपंगत्व प्राप्त झाले. त्यांच्या जीवनातील प्रकाश संपला. लहानपणापासूनच संगीताचा आवड होती, संगीत एैकण्यासाठी ते आपल्या मित्रांसोबत ग्वालगीरच्या यात्रेत गेले आणि तिथून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. यात्रेत मित्रांची साथ सुटली, एका ट्रकमधून ते विजापूरला दाखल झाले. विजापूरच्या रेल्वेस्थानकावर भीक मागून पोटाची आग शांत केली. पोलीसांनी त्यांना पकडल, अशा प्रकारचा खडतर जिवनाचा प्रवास त्यांनी अनुभवला. शेवटी लातूर येथे स्थायिक झाल्या वर अनेक शिष्य तयार करण्यात यश आले. मराठवाडा तसेच पूर्ण महाराष्ट्र भर गुरुजीं चा खूप मोठा शिष्य परिवार आहे.
No comments:
Post a Comment