बनारस (काशी) येथे माझ्या प्रारंभीच्या संगीत शिक्षणाच्या काळात तीन वर्षे घालविण्याचे भाग्य लाभले.
भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे पवित्र शहर, प्रत्येक क्षणी अध्यात्म, परंपरा आणि संगीताचा अद्वितीय संगम अनुभवायला देत राहिले.
काशी विश्वनाथाचे दिव्य दर्शन, बनारस हिंदू विश्वविद्यालयाची विद्यामय परंपरा, कबीर चौरा आणि रामपुरा येथील संगीताची गंधमय परंपरा, तुलसी घाटाची शांतता —
संकट मोचन संगीत समारोह आणि ध्रुपद मेळ्यांसारख्या उत्सवांनी तर मनाला अक्षरशः संगीतसाधनेत विलीन करून टाकले.
नागरी नाटक मंडळी आणि अशा असंख्य सांस्कृतिक ठेव्यांनी समृद्ध असलेली ही काशी,
माझ्या संगीत प्रवासातील एक अमूल्य आणि अविस्मरणीय अध्याय ठरली.
https://youtu.be/esvPdEj-DFM
No comments:
Post a Comment