नागराज मंजुळे यांची 'मटका किंग' नावाची वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित होत आहे.त्यामधील अष्टपैलू कलाकार सिद्धार्थ जाधव याने नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला तो असे म्हणतो की,
नागराज मंजुळे भावा... तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक नटाची असते. ‘मटका किंग’च्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली... माझ्या आयुष्यातली पहिली वेबसीरिज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली... ‘दगडू विचारे’ नावाचं पात्र तू मला साकारायला दिलंस. माझ्यावर विश्वास ठेवला... त्यात ॲमेझॉन प्राईमसारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम, यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर आणि अशा मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नटाला प्रत्येक वेळी चांगलं काम करण्याची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहिलेला डायलॉग तुलाच सारखा सारखा ऐकवतो... “शुक्रिया सेठ.... काम देने के लिए नहीं... भरोसा रखने के लिये” – आपला सिद्धू.
#NagrajManjule #SiddharthJadhav
No comments:
Post a Comment