Tuesday, August 5, 2025

Vedang Dharashive.

 

वेदांग धाराशिवे.   

(शास्त्रीय गायक.)

                                                 गेली अनेक वर्षे जागतिक स्तरावर विविध देशातून संगीताचे कार्यक्रम करण्याचा अनुभव. अमेरिकेतील  Iowa राज्यातील नामांकित विद्यापीठात(MUM) प्राध्यापक म्हणून  कार्य केले. सियाटल वाशिंग्टन येथे रेडिओ मध्ये निर्माता व सांगीतिक कार्यक्रमाचे संयोजक म्हणून काम पाहिले.                                     शास्त्रीय संगीताचे गायक या नात्याने कॅलिफोर्निया येथील DEA रेकॉर्ड कंपनी सोबत गाण्याचे अल्बम केले. मराठी नाटक तसेच प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर व सुरेश भट यांच्या गीतांना संगीत दिले.                                   कला अकादमी गोवा इथे संगीत विभागात कार्यरत तसेच गोव्यात पाश्चात्य संगीताबरोबर फ्युजन केले. Iowa स्टेट कम्युनिटी तर्फे पंडीत उपाधी प्राप्त. गंधर्व मंडळा तर्फे अलंकार व कला अकादमी गोवाची संगीत कुशल पदवी प्राप्त. नार्थ अमेरिकेत दहा वर्षे वास्तव्य तसेच रोमानिया, हाॅलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्वीडन, ग्रेट ब्रिटन, मॅक्सीको, पेरू, चिली, ब्राझील व तसेच अनेक देश. सर्व नमुद करणे कठीण आहे. हे शक्य झाले अशामुळे की ज्या अंतर्राष्ट्रीय संस्थेबरोबर करार होता त्यांची सेंटर जगातील प्रत्येक देशात व देशातील प्रत्येक मोठय़ा शहरांमध्ये असल्याने हे शक्य झाले. सर्व कार्यक्रम त्यांनीच घडवून आणले. 

                         

राग विस्तारात ध्यानधारणा व समाधीकडे घेऊन जाणारी स्वर विस्ताराची भावातीत मांडणी करण्याचा अनुभव जो की परमोच्च ईश्वरीय चेतना आहे. हल्ली व्हिलेज म्यूजिक क्लब आलमला द्वारे गेली आणेक वर्षे संगीत क्षेत्रात ग्रामीण तथा शहरी भागात संगीताचे प्रचार प्रसाराचे काम अविरत सुरू आहे प्रतेक वर्षाकाठी अनेक संगीताचे कार्यक्रम व प्रात्यक्षिक केली जातात जेने करुन संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे जी आपली सांस्कृतिक धरोवर आहे. सोशल मेडीया वरुण देखिल संगीताचा प्रचार-प्रसारवश समर्पित आहे. व्हाॅटसप वरती 500 ग्रुप चे सदस्यत्व असल्याने संगीता वर मायक्रोब्लाग च्या स्वरुपात लिखाण करुन त्याला संगीताची लिंक जोडलेली असते. हीच पोष्ट सर्व ग्रुप वर पाठविण्यात येते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत संगीत पोहचवण्याचा फक्त एकच मानस आहे. युट्यूब चॅनल वरती संगीताचे 2500 विडियो अपलोड केली आहेत. आतापर्यंत 11 लाख लोकांनी चॅनलला भेट दिली आहे. चॅनल मुळे देखील संगीता चा प्रसार होत आहे. फेसबुक वर संगीताचे 15 ग्रुप काडण्यात आली आहेत ज्याची सदस्य संख्या 1,25,000 वरती पोंहचली आहे. ही बाब पण संगीताच्या प्रचारात खूपच साह्यक आहे. तसेच बाकिच्या सर्वच सोशल मीडिया प्लेटफ़ॉर्म वर सहभाग आहे. आजच्या या डिजीटल युगात संगीताच्या प्रसारासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत जसे की ऑनलाइन क्लासेस किंवा कार्यक्रम प्रस्तुत करने चालूच आहे. या संगीत यज्ञात शेवटच्या श्वासापर्यंत कधीच खंड पडणार नाही. पूर्ण जीवन संगीतासाठी वाहून घेतल्याने व दररोज च्या अभ्यासाने त्या अतीऊच्य देव चेतनेची अनुभूती होते व मोक्ष प्राप्तिचा मार्ग सुलभ होतो.


"षड्जादयः सप्त स्वराः मधुरं गायन्ति यः सदा।

स गीतज्ञो हि विज्ञेयः सदा पूज्यो महीतले॥"


वेदांग धाराशिवे.

व्हिलेज म्यूजिक क्लब आलमला.

महाराष्ट्रा.

9325042830

No comments:

Post a Comment