vedang`s music

Harmonious, melodic, tuneful vibrations of the age old divine sounds, which has contemplative stupendous effect on mind, body and surroundings in the nature. It is a meditation. Based on breathing exercise Pranayam(naad yoga) .Breathing which inhales and excels for longer gives more oxygen to the body.Alap is the soul of the Raga. It shows the caliber of the musician. His capacity of intellection, mind’s eye, how far he could think of the boundaries of the thought with creative combination of melodic notes set to the rhythem.It takes years of practice to get command on the scale to perform freely. Every days practice brings the different shades to the raga, fulfillment of intense happiness, ecstasy, exaltation, euphoria the total bliss.Experience of supreme sound the Naad Brahma. About me- Performing vocals for last many years around the globe. Taught music in USA for ten years including one of the prestigious universities(MUM) at Fairfield Iowa. Worked for the Radio in North America as producer and host(musicals). http://www.youtube.com/user/MsVedang

Tuesday, April 18, 2017

The best article on Earth protection.

Earth protection.


    अमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा महाराष्ट्राच्या दुष्काळी गावांतील जलसंधारणावरील 'तुफान आलंया' हा कार्यक्रम पाहिला.
       याचे अर्थसहाय्य रिलायन्स टाटा, इत्यादी उद्योग समूहांकडून होत आहे हे त्यात सांगितले गेले.
        ५५-६० वर्षापर्यंत, मागील सुमारे दहा हजार वर्षे भारत हा जगातील उत्कृष्ट शेती करणारा देश होता. भूजल पातळी जमिनीच्या पृष्ठभागालगत होती.पारतंत्र्यात ब्रिटीशांनी खूप जंगल तोडले, तरीही १९४७ सालात ५०% क्षेत्रात घनदाट जंगल होते. चाळीस हजार वाघ होते. आज घनदाट जंगल फक्त  २-४% उरले आहे.
        भारत स्वतंत्र झाला तेव्हा पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांची संख्या फक्त  सुमारे २५० होती. राजस्थानातील जैसलमेर, बिकानेर, जोधपूर अशा  अत्यंत कमी म्हणजे, पूर्ण पावसाळ्यात फक्त २ ते ४ इंच पाऊस होण्याच्या क्षेत्रातील गावांतही  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नव्हता.आता देशातील व जगातील सर्वाधिक
पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात म्हणजे 'चेरापुंजी' येथे पावसाचे प्रमाण तर कमी झालेच आहे परंतु तेथील गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. देशातील सुमारे सात लाखांपैकी २५६००० गावांत दुष्काळी स्थिती असते.
           याबाबत 'सत्यमेव जयते'  परिवाराने चिंतन करावे. याच्या कारणाचा शोध घेतला तर त्यांना दिसेल की, औद्योगिकरण व त्याचा भाग असलेले शहरीकरण हे त्याचे कारण आहे. गांधीजींनी हिंद स्वराज्यात १९०८ सालीच सांगितले की _*'यंत्रामुळे युरोप उजाड झाला, हिंदुस्थानचेही तेच होईल'*_ .गांधीजींचा इशारा खरा ठरत आहे.भारतातील शेतीबाबत आजही प्रमाण मानला जाणारा 'अॅन अॅग्रिकल्चर टेस्टामेंट' हा ग्रंथ लिहिणारे, ब्रिटीशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकवण्यासाठी पाठवलेले परंतु भारतातील शेतीने प्रभावित झालेले शेतीतज्ञ सर डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांच्या भाषेत सांगायचे तर_*यंत्राची भूक पृथ्वी भागवू शकली नाही.*_                                   मुंबईचे उदाहरण पहा. देशातील औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या या शहरातून शेती आणि निसर्ग नामशेष झाला. या शहराच्या उभारणीसाठी व चालण्यासाठी देशातील जंगल,डोंगर,नद्यांचा क्षणोक्षणी नाश होतो.
        वाढणा-या उद्योग व शहरांना श्रमिकांचा तसेच अन्नधान्य व इतर संसाधनांचा पुरवठा व्हावा म्हणून देशातील स्वयंपूर्ण ग्रामीण भागांत हरित क्रांतीचे ग्रहण  लावले गेले. जी माणसे समस्या सोडवू पाहतात ती गफलतीने या समस्येचे कारण जे औद्योगिकरण, त्यालाच उपाय मानतात.  ही मुलभूत चूक आहे.
     सन १८३० पर्यंत जगातील उत्पादन व व्यापारात भारत व चीनचा ७३% वाटा  होता. तेव्हा उद्योग होते पण ते स्वयंचलित यंत्र व खनिज ऊर्जा किंवा वीजेवर आधारित नव्हते.
          तेव्हा मानवजातीसाठी  पैशाला महत्व नव्हते.बहुतांश भारतात त्याचे अस्तित्वही नव्हते._*''बियाण्याला पावित्र्य होते.शेतकरी ते विकत नव्हता, ते प्रेमाने दिले व घेतले जात होते.''* मात्र नफा हीच प्रेरणा मानणा-या अर्थव्यवस्थेने उलट वाटचाल घडवली. रासायनिक खते, धरणे, ट्रॅक्टर ,  बुटक्या जातीची संकरित वाणे, 'बोलगार्ड' ,' राउंड अप' ते जनुक तंत्रज्ञान व  पुन्हा  न उगवणा-या टर्मिनेटर बियाण्यापर्यंत  वाटचाल झाली.
       केवळ नफ्यासाठी पृथ्वीचे सृजनाचे तत्व यांना अडचणीचे वाटू लागले.एका दाण्यापासुन शेकडो, हजारो दाणे देणारे निर्मितीतत्व संपवावे असे प्रयत्न हे यंत्रमानव करू लागले.पृथ्वीवर निर्जिव तत्व सोडले गेले. हे पृथ्वीवर पसरून शाश्वत असू शकणारे सृजन धोक्यात आले.
         अमीर खान म्हणाले की या कामामुळे दहा पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यांना तापमानवाढीची माहिती नाही  असे दिसते. पुढील माहिती पहा.
  १)    पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४०९ पीपीएम ( १पीपीएम = ३०० कोटी टन ) झाले आहे.प्रतिवर्षी २ पेक्षा जास्त पीपीएम (६०० कोटी टन ) ची भर पडत आहे. औद्योगिक-शहरी कार्बन उत्सर्जनामुळे  फक्त पुढील काही वर्षांत तापमानवाढ अनियंत्रित होईल असा अंदाज नासाच्या 'गोडार्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीज' चे माजी संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांनी त्यांच्या 'स्टाॅर्म्स ऑफ माय ग्रॅण्डचिल्ड्रन' या १९०९ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथात व्यक्त केला होता. तसे झाल्यास या शतकात मानवजात नष्ट होईल,म्हणजे आताची पिढी शेवटची पिढी ठरेल असा इशारा त्यांनी दिला.
   २)     फेब्रुवारी २०१७ हा सलग २२ वा महिना होता ज्याचे तापमान आधीच्या वर्षातील त्याच महिन्यापेक्षा ०.२०°से ने जास्त होते.
  ३)   जाने.१९८५ पासुन, फेब्रुवारी २०१७ हा सलग ३७४ वा महिना होता ज्याचे तापमान २० व्या शतकाच्या सरासरीपेक्षा जास्त होते.
    ४)    या गतीने मागील वर्ष व पुढील चार वर्षे मिळून पाच वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान १° सें ने वाढेल. हे कोट्यावधी वर्षांत घडले नाही.
   ५)    डिसेंबर २०१५ मधे जगातील सर्व १९६ देशांचे प्रमुख एकत्र येऊन 'पॅरिस करार' करण्यात आला.मानवजात वाचवण्यासाठी उद्योगपूर्व म्हणजे यंत्र येण्याआधीच्या सन १७५० पूर्वीच्या काळाच्या तुलनेत २° से ची वाढ तापमानात होऊ नये यासाठी सर्व देशांनी कार्बन उत्सर्जनात कपात करावी असे ठरले.
  ६)    जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासाप्रमाणे मेे २०१५ मध्ये  पृथ्वीवरील कार्बनच्या प्रमाणात उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत ४०० पीपीएम पेक्षा जास्त वाढ  झाली, हे प्रमाण १७५० पेक्षा ४३% ने जास्त आहे.
 ७)    या शतकातील सर्व १६ वर्षे पृथ्वीवरील सर्वांत उष्ण वर्षे होती. सन २०१४-१५-१६ या वर्षांत ०.२०°से ची वाढ सरासरी तापमानात झाली. गेली ६-७ वर्षे पृथ्वीच्या एकंदरीत व स्थानिक सरासरी तापमानात सतत वाढ होत आहे. अहवाल स्पष्टपणे म्हणतात की, हा पॅच नसून ट्रेंड आहे. उत्तर ध्रुवप्रदेशांत पृथ्वीच्या गतीपेक्षा दुप्पट वेगाने वाढ होत आहे. अंटार्क्टिका हा दक्षिण धृवीय क्षेत्रात सरासरी तापमानात वेगाने  वाढ होत आहे. मागील ५० वर्षांत तेथे सरासरी तापमानात ३° से ची अभूतपूर्व वाढ झाली. पश्चिम अंटार्क्टिकातील ८७% भागातील हिमनद्या सातत्याने मागे हटत आहेत. याचा एकत्रित अर्थ असा आहे की, तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. तातडीने युनोकडून पृथ्वीवर 'पर्यावरणीय आणिबाणी' घोषित व्हायला हवी. तरच जनतेला याचे गांभीर्य समजेल.
       परंतु तसे घडत नसून, अजूनही उद्योगांचा प्रभाव कायम आहे. उष्णता वाढली म्हणून लोक ए.सी. बसवून घेत आहेत व आपल्या शवपेटीवर आपणच शेवटचा खिळा ठोकत आहेत.
      वरील वैज्ञानिक  माहिती जागतिक हवामान संघटना,नासा व राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासन(अमेरिका) या जगातील प्रमुख संस्थांच्या अहवालांतील  आहे.
    पंधरा दिवसांपूर्वी भारतात आलेली उष्णतेची लाट अभूतपूर्व होती. ही धोक्याची घंटा होती. याकडे दुर्लक्ष करणे घातक आहे कारण पृथ्वीच्या इतर भागात आज उष्णतेच्या लाटा आहेत.या उष्णतेमुळे झालेली ध्रुवीय बर्फ व महासागराच्या पाण्याची वाफ हिमालय,कोलंबिया,आॅस्ट्रेलिया, पेरू, न्यूझीलंड येथे  प्रचंड पाऊस व बर्फवृष्टीच्या रूपात अवेळी कोसळत आहे. चक्रीवादळे वारंवार येत आहेत. मात्र आपल्याकडे टीव्ही, वृत्तपत्रे 'ऐन उकाड्यात पाऊस पडला म्हणून पर्यटक सुखावले', असे तद्दन चुकीचे वार्तांकन करून सत्य दडवत आहेत.
        'पॅरिस करार' फक्त ४ वर्षात अयशस्वी ठरून मानवजात वाचण्याची शक्यता धूसर होत आहे. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून बहुतांश प्रसारमाध्यमे प्रयत्नशील असल्याचे जाणवते.
       भारतात वर्धा, दिल्ली इत्यादी ठिकाणी पारा ५०° ला भिडत आहे. राजस्थानात अनेक ठिकाणी तापमान  ५०° पेक्षा जास्त होत आहे. चंद्रपूरला गेली काही वर्षे ५५°सें पर्यंत तापमान पोचते, वणवे लागतात. जगात जेथे अधिकृत नोंदी घेतल्या जात नाहीत अशा ठिकाणी तापमान ६०° ते ६५° पर्यंत पोचत आहे, मात्र हवामान खाते व वेधशाळा भिराच्या तापमानासारख्या गोष्टींवर नाहक बोलत आहेत व त्यावर चर्चा घडवत आहेत. परंतु ते पृथ्वीच्या  तापमानवाढीच्या वेगाबाबत व ती अनियंत्रित होण्याबाबत मूग गिळून गप्प आहेत किंवा त्यांनाच याबाबत ज्ञान नसावे असे वाटते. जे काही कारण असेल ते असेल, परंतु यामुळे जनता पूर्ण गाफील आहे. याबाबत जागृत व सावध करू इच्छीणा-यांच्याच डोक्यात काही बिघाड झाला असावा असे वाटणारी माणसे समाजात नेहमी दिसतात. त्याचे अर्थातच आश्चर्य वाटत नाही.
         'अमीर खानचे कार्यक्रम' व 'अवकाळी पावसाने दिलासा मिळाला'
अशा बातम्यांचा मारा होत राहिला तर यापेक्षा वेगळे अपेक्षित नाही, पण आता अज्ञान हे कृती न करण्याची सबब ठरू नये. ते विनाशास आमंत्रण ठरेल.
     प्रश्नांची उत्तरे जीवनपद्धतीतच असायला हवी. सध्याची औद्योगिक जीवनपद्धती जीवन विरोधी आहे. दोन हजार वर्षांपूर्वी पाराशर ऋषी म्हणतात, *"जंतुनाम  जीवनम् कृषि:".*  
       शेती ही जीवांच्या परस्पर संबंधावर अवलंबून होती. ज्या मातीत गांडूळ नाही, ती प्रसवणारी मातीच नाही. ती काळी आई नाही. फक्त रासायनिक पावडर आहे. या मातीत जी केली जाते,ती शेती नाही. ते अन्न नाही. ते औद्योगिक-रासायनिक उत्पादन आहे. नैसर्गिक शेतीतून सतत ६० वर्षे विक्रमी उत्पादन घेणारे उंबरगावचे भारतीय नैसर्गिक शेतीचे प्रणेते श्री. भास्कर सावे म्हणत , *''जंगलाला कोणी खत देत नाही, पाणी देत नाही, नांगरणी करत नाही."* अशी शेती हवी.
        गांडूळे व जिवाणू, वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे पिकांना आवश्यक अशा पोषक द्रव्यात रूपांतर करतात. हे अवशेष   जंगलातील जमीनीवर आच्छादन करतात. अशा जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो, पाणी साचत नाही व त्याचे बाष्पीभवनदेखील होत नाही, ओलावा वर्षभर टिकून  राहतो. नांगरणीचे काम गांडूळेच करतात. मुळांना प्राणवायू मिळतो.
   शेतीत यंत्राची , रसायनांची कधीही गरज नव्हती. अर्थातच उत्पादनखर्च नव्हता. अशा शेतीच्या प्रदेशात जलसंधारणाची वेगळी गरज नाही. पण यातील निसर्गाचा संदेश की, यंत्र व पैसा ही चूक आहे, ओळखून भारतीय शेतकऱ्यांनी १० हजार वर्षे एकाच खाचरात स्थानिक वाणांची त्या त्या ऋतुमानाप्रमाणे  मिश्र व फिरती पिके घेऊन शाश्वत व सदाहरित शेती केली.
     अगदी अलिकडच्या काळात  तंत्रज्ञानामुळे आलेल्या व्यर्थ वस्तू टाळल्या तर केवळ शेतकरीच नाही तर सर्वांची पैशाची गरज संपेल. औद्योगिक शहरी व्यवस्थेसाठी बारमाही सिंचन व इतर प्रकारे पाण्याचा अयोग्य वापर सुरू झाला. त्यापायी लक्षावधी वर्षे बारमाही वाहणाऱ्या नद्या काही दशकात आटल्या व नष्ट झाल्या. इतिहासात अनेक संस्कृत्या नष्ट होण्याचे हेच मुख्य कारण होते. आज यंत्र व इतर गोष्टींमुळे विनाशाला पृथ्वीव्यापी परिमाण मिळाले आहे.
       निसर्गाच्या आधाराने त्याच्याशी एकरूप होऊन, कृतज्ञता बाळगून जगणा-या शेतकऱ्यावर कधीही निराश होण्याची वेळ आली नव्हती. आत्महत्या तर दूरच राहिली. हरितक्रांतीने शेतीला जबरदस्तीने अथवा प्रलोभने दाखवून बांडगुळी, अशाश्वत अशा औद्योगिक - शहरी व्यवस्थेचा भाग बनवण्यात आले. वस्तूंचे व्यर्थ उत्पादन करणारे मायावी औद्योगिक जग प्रतिष्ठेची झूल पांघरून अस्सल निसर्गाधारीत जगाला नष्ट करत आहे. नंतर ते स्वतःही नष्ट होणार आहे. या प्रक्रियेला आर्थिक विकास असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीवर अशी काही आर्थिक भौतिक प्रगती असू शकत नाही, याकडे स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या शिक्षितांचे दुर्लक्ष झाले. आता नामशेष होण्याची वेळ आल्यावर तरी डोळे उघडावे.
       आता 'जलयुक्त शिवार' किंवा 'जलसंधारण' पुरेसे नाही. किंबहुना ते केले तरी आपण नष्ट होऊ. मुख्य प्रश्न समस्येच्या मूळाशी जाण्याचा आहे. तात्काळ कार्बनचे उत्सर्जन थांबवणे व तो शोषणारे हरितद्रव्य म्हणजे जंगल व सागरातील हरितद्रव्य वाढीस लागणे आवश्यक आहे. हे फक्त औद्योगिकरण व शहरीकरण थांबले तरच शक्य आहे.
       जे भारतातील शेतकरी  दोन पिढ्यांच्या आधी, म्हणजे ५०-६० वर्षापूर्वी बियाणे देखील विकत नव्हते त्यांना ५० लाखाच्या बक्षिसाची लालूच द्यावी लागते हे दुर्दैव आहे. समस्या, यंत्र व पैशातच आहे. पृथ्वीला यंत्र व चलन मान्य नाही हे सर्वांनी ताबडतोब लक्षात घ्यावे. पैसा बाळगणारा शेतकरी व त्याला  पैसा देणारा शहरी वा ग्रामीण ग्राहक या दोनही गोष्टी औद्योगिकरणाच्या चाैकटीतील आहेत, व ही चाैकट झुगारून दिली आणि इतर सर्व जीवमात्रांप्रमाणे भुकेसाठी अन्न ही पृथ्वीप्रणित संकल्पना स्वीकारली तरच  महाराष्ट्रातील शेतकरी व मानवजात वाचेल.
     सावधान ! धोक्याची घंटा घणघणते आहे. अमीर खान व त्याचा 'सत्यमेव जयते' परिवार आणि प्रेक्षक यांनी विचार करावा.  
   



No comments: